प्रत्येक घरात शौचालय असावे हे मोदीजींचे स्वप्न आहे परंतु नागपुरात वाल्मिकी समाजाचे कुटुंब शौचालयापासून वंचित
नागपूर समाचार : धरमपेठ झोन अंतर्गत गाडगा बस्ती आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे. वाल्मिकी समाजाचे एक हिंदू दलित परिवाराचे नागरिक राकेश गणेश चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासह पत्रपरिषदेत धाव घेतली कारण, गेल्या सहा महिन्यापासून शौचालयापासून वंचित आहे. त्याकरिता अनेकदा तक्रारी दिल्या सगळ्यांकडे निवेदन दिले. परंतु अद्यापही कोणीही त्यांची मदत केली नाही.
पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी DPDC अंतर्गत त्यांच्या निधीतून सिवर लाईन देण्यात आली होती ते त्या चेंबरला जोडणे होती परंतु बरेच अडथळे आले म्हणून सीवर लाईन जोडण्यासाठी निवेदन देण्यात आले परंतु भाजपच्या उषा भोयर यांनी नकार दिला.
प्रत्येक घरात शौचालय असावे हे मोदीजींचे स्वप्न आहे परंतु नागपुरात धरमपेठ झोन अंतर्गत वाल्मिकी समाजाचं कुटुंब गेल्या सहा महिन्यांपासून तर आज तागायत शौचालया पासून वंचित आहे. याला कारणीभूत आहे भाजप ची उपाध्यक्ष उषा भोयर गेल्या सहा महिन्यापासून शिवर लाईनचे चेंबर्स त्यांना बांधू देत नसल्यामुळे शौचालयाची सोय होऊ शकत नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक धुडकावत आहेत. असा आरोप त्यांनी पत्रपरिषदेमध्ये केला.
नागपूर धरमपेठ झोन येथील भाजपाची उपाध्यक्ष उषा भोयर यांनी चेंबर्स बांधण्यास दिला नकार यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या गरीब कुटुंबाला शासनाने मदत करावी ही मागणी त्यांच्या कुटुंबाने केली आहे.
नागपूर शहराचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी या प्रकरणा संदर्भात निवेदन दिले परंतु अद्यापही त्या प्रकरणावर कोणतेही कारवाई झालीच नाही जर त्यांच्या शहरात शौचालयानची सोय होत नसेल तर गरीब कुटुंबाचं व शहरातील नागरिकांचे काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यावे. अशी अपेक्षा सुरजित चव्हाण यांनी परिषदेच्या माध्यमातून केली आहे.