समुद्रपुर समाचार : समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तावी गावातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच विलास नवघरे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिली आहे. हेच नाही तर स्वातंत्र्य काळापासून तहानलेल्या तावी गावाला जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत येथिल नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढून दिली या त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन तावी येथील अनेक महिलांनी कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हिंगणघाट शहरातील त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सर्व महिलांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या सोबत रहाण्याचा निच्छय करीत त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सरपंच विलास नवघरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, जिल्हामहामंत्री आकाश पोहाणे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, तालुकाध्यक्ष भाजपा विनोद विटाळे, तालुका अध्यक्ष भाजपा वामनराव चंदखेडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, प्रफुल बाडेआदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तावी येथिल माजी सरपंच गोविंदराव उईके, बाळाजी मोकाशी,ललीताबाई सलाम, निरंजना कुडुमते, दुर्गाबाई कुडमते, रूपाली कुडुमते, सविता आत्राम, वनिता अत्राम, मंगलाबाई आत्राम, चंद्रकला मडावी, सीमाबाई कुमरे, रंजना कुमरे, ललिता कोयताडे, जाईबाई वल्लादे, अहिल्याबाई उईके, पंचफुलाबाई उईके, इंदुबाई मोकाशी, सुनिता सलाम, विद्याबाई परचाके, निर्मला मोकाशी, कुंताताई सलाम, सरस्वती कुडमते, ताराबाई आत्राम, आदिंसह महिलांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतला यावेळी सर्व प्रवेश घेणाऱ्यांचे आमदार समिर कुणावार यांनी स्वागत करुन सर्व पक्ष प्रवेश घेणाऱ्याचे आभार व्यक्त केले.