नागपूर समाचार : भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात भाजपा एनजीओ आघाडीचा पदग्रहण सोहळा धरमपेठ महिला सोसायटीच्या अध्यक्षा नीलिमा बावणे, शहर भाजप महामंत्री अश्विनी जिचकार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
नव्या कार्यकारणीत १२३ सामाजिक संस्थांचा सहभाग असून एक हजार संस्था एकत्रित आल्या आहेत. समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्यानि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी एनजीओ बँकेची स्थापना करण्यात आल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष राजू वाघ यांनी दिली.
अध्यक्ष राजू वाघ, महामंत्री- सुहास बिडकर, अशोक बम्ब, अंजली वडोदकर, महेश गवलानी, उपाध्यक्ष- मनोज यादव, अजय धोपटे, काकी गुजर, शारदा गावंडे, आशीष अटलोये, अमित सवडे, अरविंद रतूडी, छबु ठवरे, बिप्लव मुजुमदार, आसावरी वरकड, अशोक सावरकर अशोक गोयल, विधी झा, अखिल पवार, संपर्क मंत्री- सचिन लिमसे, सूरज दुबे, प्रवीण जूम्मनी आदींना नियुक्ती पत्र देण्यात आले.