नागपूर समाचार : भारताचे झिरो माईल अशी ओळख असलेले व भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला शनिवार २ मार्च २०२४ रोजी ७३ वर्षे पूर्ण होत आहेत. “पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. मनपाच्या ७३ वा स्थापना दिनानिमित मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मनपाचा ७३ वा स्थापना दिन हा शनिवार २ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता , सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर साजरा केला जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी हे कार्याक्रमाचे मुख्य अतिथी तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, डॉ. सुनील लहाने हे विशेष अतिथी असणार आहेत. नागरिकांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मनपाचे उपायुक्त श्री. निर्भय जैन यांनी केले आहे.