नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आक्रमण युवक संघटनेचे आगमन व उदघाटन रविवारी 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता. डॉ.आंबेडकर कन्व्हेशन सेंटर 5 वा माळा, टेका नाका, कामठी रोड नागपूर येथे संघटनेचे उद्घाटन होणार आहे.
फुले, शाहू, आंबेडकर व कांशिरामजिंच्या विचारांना गती देण्याकरिता शेतकरी, कामगार विद्यार्थी, व मोठ्या प्रमाणात बेरोजगार आणि अन्यायग्रस्त समाजाला जागृत करून त्यांचे हक्क, अधिकाऱ्यांची जाणीव निर्माण करण्याकरिता, भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी दलित, शोषित, पिडीतांच्या संरक्षणासाठी आक्रमण संघटना मैदानात उतरली आहे.
त्यावेळी कार्यक्रमाचे मुख्यमार्गदर्शक ॲड. सुनीलजी गजभिये अध्यक्षस्थानी संघटन प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. आणि प्रमुख उपस्थितीत पाहुणे प्रसिद्ध आंबेडकर साहित्यिक, पत्रकार मिलिंद कीर्ती तसेच नागपूर हायकोर्टाचे ॲड. इंद्रजीत मेश्राम यांची उपस्थिती राहतील. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून प्रमोद पाटील, अनंता रामटेके, पूजा नाखले, आशिष निस्वादे, गुणवंत गिरडकर हे सर्व उपस्थित राहतील. नागपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख ओपुल तामगाडगे च्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन होणार असून यावेळी विशाल बनसोड, धनराज हाडके, रितिक मेश्राम, अविष्कार वाहणे, जावेद पठाण, सुरज पुराणिक, सार्थक राऊत, अजय गायकवाड, कर्नल सुरेश मानवटकर, प्रफुल खोब्रागडे हे परिश्रम घेत आहे.