नागपुर समाचार : नव्याने स्थापन झालेल्या पण संघटनेच्या मजबूतीचा पाया दाखवून देणा-या “भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेयर असोसिएशन नागपूर”चा जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. व त्यांनी आप आपले विचार मांडले. प्रास्ताविक संघटनेचे प्रवक्ते व मिडिया प्रभारी-श्री आनंद कोहाड यांनी मांडले. आज स्त्रियांनी अनेकविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया” या कविवर्य केशवसुतांच्या काव्यपंक्ती केवळ स्त्रियांनीच अगदी सार्थ करून दाखवल्या आहेत.
कुठल्या एका मुद्द्यावर का होईना एकमत होणं ही काय कमी महत्वाची बाब आहे का? पण ती सार्थक करणे, ती मुर्तरुपात आणणे व त्या दिशेने ठोस पाऊल ऊचलणे जसे समाजकल्याण, समाजकार्य, सामाजिक कार्य व समान सहभाग मग क्षेत्र कोणतेही असो. स्त्री ही असावीच लागते. स्त्री वीना सम्मानच नाही, मग आपल्या देशाचे नेतृत्व का असेना? सर्व थरातील महिलांचा विकास, केवळ त्यांना तात्पुरती मदत न करता सातत्याने त्यांच्यासाठी अल्प प्रमाणात का होईना काही भरीव कार्य करून स्त्रीला सकारात्मक ऊर्जा देण्याचा संकल्प आज समाजाने केला तरच ते अधिक औचित्यपूर्ण ठरेल तेव्हाच आपण हे सर्व सणे, महिला दिन मनविण्याचे अधिकारी आहोत त्याशिवाय हा देश महिला संदर्भात कधीच प्रगती करु शकणार नाही हे विसरुन चालणार नाही. आज समाजातील स्त्रियांचा सम्मान करणे व त्यांना पुढे नेण्याचे काम करण्याची जबाबदारी पुरुष वर्गाची आहे. व म्हणून प्रत्येकानेच खारीचा वाटा ऊचलुन हे कार्य पार पाडायचे आहे, समाजाने कशा ही परिस्थितीत जगण्याचे आव्हान लिलया पेलायचे आहे” असे परखड मत मांडून आनंद कोहाड यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.
प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सविता पांडे यांनी महिला दिन व महाशिवरात्री हा योग अनेक वर्षांनंतर घडून आला तेव्हा ईतर रणरागिणींप्रमाणे माता पार्वती यांना देखील महिला दिनाच्या श्रेष्ठ देवता आहे व भारतीय रियल ईस्टेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या. प्रमुख म्हणजे आजच्याच दिवशी सकाळ वृत्तपत्रात नव्यानेच नवयुवती उप एडीटर नियूक्त झालेल्या सौ. साक्षी राऊत यांनी आपल्या जोरदार भाषणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या व त्यांची दखल देखिल घेत नसलेल्या अनेक घटनांची माहिती दिली. व त्यासोबतच महिलांना जो पगार हाती दिल्या जातो तो त्यांच्या वर खर्च करण्याचा अधिकार तरी आहे का? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. व असेच अनेक प्रश्न आपण सोडविण्यासाठी समर्थ झालो तेव्हाच आपण स्त्री स्वातंत्र्य व महिला दिन मनविण्याचे अधिकारी असू असे परखड मत मांडून उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विदर्भ वादी नेते मेजर गुणवंत सोमकुवर यांनी आपली भूमिका मांडली. तसेच तेजस बहुउद्देशिय संस्थेचे मेजर चंद्रशेखर अरगुलेवार, सरोजिनी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रोहनकुमार , विदर्भ वादी नेते श्री शंकर बर्मन यांचा त्यांच्या समाजाप्रती विशेष करून महिलांसाठी दिलेल्या अमुल्य योगदाना साठी सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या श्रीमती उषाताई लांबट, देश प्रदेश केसरी च्या संपादक श्रीमती ज्योती द्विवेदी, व अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजविरसिंह जी यांनी केले.
याप्रसंगी संघटनेच्या जवळपास शंभर महिला व बंधूंची ऊपस्थिती होती. स्ंस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ के.एम. सुरडकर, उपाध्यक्ष संजय खोब्रागड़े व संजय कृपाण,सचिव मोहन बळवाईक , कोषाध्यक्ष अनिल सोनकुसरे, अन्य पदाधिकारी प्रदिप मनवर, मनोज गोडशेलवार, आनंद खोब्रागडे, तूकाराम जंगम, राजेश चौहान, संजय सोनारकर, लक्ष्मण चुटे व ईतर पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. संचालन श्रीमती मंगला चौहान यांनी केले. तसेच श्रीमती सोनाली कांबळे, पूष्पा ढबाले, आम्रपाली गुरवे, शशिकला गोहणे, तारेश दुरुगकर व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.