नवी दिल्ली समाचार : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातील 10 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं असून त्यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, नागपूर चंद्रपूर, नांदेड, जालना, दिंडोरी, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, म्हाडा आणि सांगली या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
सांगलीमधून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना संधी देण्यात आली आहे, तर म्हाडामधून रणजीतसिंह निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संधी देण्यात आली आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
धुळ्यामधून डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना लॉटरी लागली असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. लातूरमधून सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपची उमेदवारी जाहीर
१ चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना – रावसाहेब दानवे
४) बीड – पंकज मुंडे
५) पुणे – मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा – रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई – पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व – मिहीर कोटेचा
११) नांदेड – प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर – सुजय विखे पाटील
१३) लातूर – सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव – स्मिता वाघ
१५) दिंडोरी – भारत पवार
१६) भिवंडी – कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर – नितीन गडकरी
१९) अकोला – अनुप धोत्रे
२०) नंदुरबार – डॉ. हिना गावित