नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) इंदोरा बुद्ध विहार येथे मा. भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेतली. यावेळी भन्ते सुरेई ससाई यांच्या प्रकृतीची ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून चौकशी केली.* काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेमुळे भन्ते सुरेई ससाई यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी ना. श्री. गडकरी यांनी सहकार्य करून वेळोवेळी प्रकृतीची चौकशी देखील केली होती.
भन्ते सुरेई ससाई यांनी स्वतः या आठवणींना उजाळा देत ना. श्री. गडकरी यांना आशीर्वाद दिले आणि लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या. ना. श्री. गडकरी यांनी इंदोरा बुद्ध विहार येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच ज्येष्ठ मेंदूरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध उद्योजक श्री. बसंतलाल शॉ, श्री. गुरबक्ष सिंह लांबा यांच्याही निवासस्थानी ना. श्री. नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली.