नागपूर समाचार : सकल माहेश्वरी समाजातर्फे गुरुवारी, २८ मार्च रोजी भाजपचे विद्यमान खासदार, केंद्रीयमंत्री व लोकसभेचे आगामी उमेदवार नितीनजी गडकरी यांचे त्यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या रूपाने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माहेश्वरी समाजाचे प्रतिनिधी म्हणून नगर माहेश्वरी सभा नागपूरचे अध्यक्ष कमल तापडिया, सचिव गिरधर चांडक, संघटनमंत्री सुरेश गांधी, संस्थापक सचिव तथा नगर माहेश्वरी महिला समितीच्या माजी अध्यक्षा डॉ.कमला मोहता, माजी अध्यक्षा सरला बागडी, सदस्य डॉ. माहेश्वरी पंचायतचे कोषाध्यक्ष विनोद फाफट, दीपक मोहता, बडी मारवाड माहेश्वरी पंचायतीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, सचिव राम अवतार तोतला, भारतीय जनता पार्टी (पूर्व नागपूर) सरचिटणीस संदीप साबू, महिला अध्यक्षा जयश्री बियाणी, बिकानेरी माहेश्वरी पंचायतीचे अध्यक्ष गिरधर डागा, डॉ. गिरीश नथानी, महिला अध्यक्षा ज्योती, कोठारी, भाजपा शक्ती बूथ प्रमुख (लक्ष्मी नगर) अजय डागा, यांच्यासह समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.
नितीनजी गडकरी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजयासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.