अंदाजे बत्तीस वर्षांपूर्वीची आठवण. चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात नविनच एम.फिल. काॅमर्स मधे सुरू झाल होत. मी प्रवेशासाठी गेलो परंतू जागा फूल झाल्या होत्या. मला अॅडमिशन घ्यायच होतं पण अॅडमिशन झाले नाही. माझे M.Com. झाले होते.
अॅडमिशन होत नाही म्हणून मी निराश झालो. गावी परत निघालो तेंव्हा एक उमदा तरूण दोन तीन मित्रांसोबत तिथ उपस्थित होता. तो म्हणाला तुला मी अॅडमिशन घेऊन देतो.मी म्हणालो जागा फुल झाल्या आता अॅडमिशन होत नाही.
तो म्हणाला माझं अॅडमिशन झाले आहे. मी नंतर ही M.Phil. करू शकतो. तुला गरज आहे तू करून घे. ओळख नसताना ही त्यान त्याच अॅडमिशन रद्द करून माझ अॅडमिशन करून देण्याचा मोठेपणा दाखवला. मी म्हणालो दादा मी कुठेही अॅडमिशन करून घेईल. तुमच्या शुभेच्छा आहेत माझ्या पाठीशी. मी नंतर नागपुरात M.PHIL. शिक्षण घेतले. त्यान चंद्रपूरला M.PHIL.केल. मी त्यांचा मोठेपणा विसरलो नाही. तो व्यक्ती म्हणजे सुधीर भाऊ…
माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार. तुमचा मोठेपणा हिच तुमची ओळख आहे. तुम्ही अर्थमंत्री झालात.
आता खासदार साठी उभे राहता आहात. मी माझा गोतावळा तुमच्या पाठीशी आहोत. तुमचा विजय निश्चित आहे. मी ज्यू.लेक्चरर म्हणुन आता निवृत्त झालो आहे. तुमच्याशी नंतर भेटण्याचा योग नाही आला. तुमचा तो दिलदार पणा मला सदैव लक्षात राहील.