‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
नागपुर समाचार :- आज देशातील एकूण 102 मतदारसंघात लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. राज्याचा विचार केला तर पूर्व विदर्भात येणाऱ्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाचही मतदारसंघात महायुती उमेदवार मोठ्या मतधिक्क्याने जिंकणार असा विश्वास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केला.
विदर्भ दौऱ्यावर जाण्यापूर्वी जयदीप कवाडे यांनी पत्नी प्रतिमा कवाडे यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी लक्ष्मी नगरातील पितळे शास्त्री शाळेत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती पीरिपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
जयदीप कवाडे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात देशाचा गेल्या दहा वर्षात शेतकरी, गोरगरीब, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यांनी राबविलेल्या विविध योजनांतून झालेल्या बदलामुळे दारिद्ररेषेतून कोट्यवधी जनता आज बाहेर पडली आहे. महायुतीचे सरकारने मोदींच्या नेतृत्वात देशात विकासाला महत्त्व दिले. मोदी यांच्या कामाची दखल आज पूर्व विदर्भातील जागरूक मतदार घेत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी विदर्भातील पाचही मतदार संघातून महायुतीचा मोठा विजय निश्चीत असल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.