- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

कामठी/येरखेडा समाचार : हनुमान जयंतीच्या पर्वावर येरखेड्यात निघाली भव्य शोभायात्रा

ठिकठिकाणी शोभयात्रेच स्वागत व प्रसादाचे वितरण

कामठी/येरखेडा समाचार :- तालुक्यातील येरखेडा येथील जय हनुमान विठ्ठल रुक्माई मंदिरात हनुमान जयंतीच्या पर्वावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले जय हनुमान विठ्ठल रुक्माई मंदिर तेलीपुरा येथे सजविलेल्या रथावरील भव्य हनुमान मूर्तीची मंदिराचे पुजारी मधुकर नाटकर, माजी पंचायत समिती उपसभापती देवेंद्र गवते यांचे हस्ते पूजा अर्चना करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली, बँड, डीजे, ढोल ताशे,‌ फटाक्याच्या आतिषबाजीत निघालेली मिरवणूक दुर्गा चौक, मुप्पीडवार लेआउट, शिवपंचायत मंदिर, झेंडा चौक, शिवाजी महाराज पुतळा,‌‌ रामकृष्ण लेआउट, टीचर कॉलनी नगर भ्रमण करीत तेलीपुरा हनुमान मंदिरात शोभायात्रेचे समापन करण्यात आले ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले सायंकाळी महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.

महाप्रसादाला आमदार टेकचंद सावरकर, अनिल महामंत्री अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, माजी सभापती उमेश रडके, येरखेडा चे माजी सरपंच विश्राम भंनारे‌, मंगला कारेर्मोरे, मनीष कारेर्मोरे, उपसरपंच मंदा महल्ले पाटील, चंद्रकांत गवते, गेंदलाल गवते, गुलाबराव वाडीभस्मे, केशवराव गवते, गजानन तिरपुडे, संजय गवते, अरुण गवते, रमेश गवते, रमेश वाडीभस्मे, जितेंद्र वंजारी, भैयालाल वंजारी, हंसराज वंजारी, दादू भस्मे, जॉनी भस्मे, गंगाधर समरीत, मनोज नाटकर, विजय भस्मे, बापू समारीत, अनिल भस्मे, विकास गवते, प्रमोद वंजारी, प्रशांत झलके, जया भस्मे, वनिता नाटकर, आचल तिरपुडे, शालिनी भस्मे, सोमेश्वर पाहुणे, कुळदीप पाटील, मुकेश कनोजिया सहा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *