नागपूर समाचार :- साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर च्या वतीने दिला जाणारा आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार कामठी येथील उद्योजिका वंदना दिपक रायबोले यांना प्रदान करण्यात आला.
आईन्स्टाईन सभागृह, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या संमारंभात ५ मे २०२४ रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात साहित्य धारा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक डॉ. संघर्ष सावळे, जयश्री सोनकवडे जाधव (प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण छ. संभाजीनगर), प्रा.डॉ.संजय मोहोळ (संगीत विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय छ. संभाजीनगर), पूज्य भंतेजी डॉ.चंद्रबोधि, श्री हिवाळे सर (अध्यक्ष संविधान क्रांतीदल बुलढाणा) डॉ.विजयकुमार कस्तुरे, डी.जे.शेगोकार (अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण तथा माजी जिल्हा न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
वंदना रायबोले यांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून समाजात एक आदर्श उद्योजिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहे.