पाणी बचाव अभियान
नागपूर समाचार :- ‘पाणी, आज संपूर्ण जगात कळीचा मुद्दा असलेला हा विषय, आपली पृथ्वी 70 टक्के पाण्याने वेढलेला असूनही त्यातील फक्त 0.65 टक्के पाणी मानव आणि प्राणी मात्रांसाठी पिण्यायोग्य आहे. जगातील कित्येक देश आज पाण्यावाचून स्थलांतराच्या उंबरठ्यावर आले आहेत. भारत देश तसा पाण्याच्या बाबतीत समृद्धच भारतात ग्लेशियर, तलाव आणि नद्या मध्ये भरपूर जल साठा आहे पण नियोजन शून्य अमाप वापर असल्या कारणाने कित्येक भागात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना कित्येक मैल पायपीट करावी लागते. कुपणालिकेचा स्वैर वापर, पाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव व रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल असलेली उदासीनता हया कारणाने आज आपल्या देशातील भूजल स्तर 700 फुटांहून अधिक खाली गेलेला आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ऐकून नियोजनबध्द पद्धतीने पाण्याचा वापर नियंत्रित करणे व पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे हे उपाय वेळीच केल्या गेले नाहीं तर आपली येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
ह्या गंभीर विषयाबद्दल जनजागृती ची गरज लक्षात घेऊन कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल च्या व्यवस्थापनाने शाळेतली कला शिक्षकांच्या मदतीने मुलांना प्रोत्साहित केलें, आणि उन्हाळी सुट्ट्या मामाच्या गावाला जाऊन मौज मज्या करण्या सोबतच समाजजागृती करीता प्रयत्न करण्यासाठी सुद्धा वापरल्या जाऊ शकतात ह्याचे उदाहरण सादर केले. मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात बसवलेली पाणी समवर्धन ह्या विषयावरील नुक्कड नाटिका नक्कीच काही प्रमाणात पाण्याच्या समस्येबद्दल जनजागृती करेल ही आशा आहे. शाळेने ठरवल्या प्रमाणे सदर नाटिकेचा पहिला प्रयोग मॉर्निंग वॉक ची वेळ साधून अभ्यंकर नगर गार्डन मध्ये सादर करण्यात आला, सदर नाटकाला भागातील सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहीं लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेंव्हा त्यांनी अशे प्रयोग हि काळाची गरज आहे व कूर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाची व शाळेची प्रशंसा केली. शाळा हा प्रयोग, सभोवतालच्या किमान 10 गार्डन्स मध्ये करून जनजागृती करणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी पलीत ह्यांनी सांगितले.
सदर नाटिकेच्या बांधणीत शाळेच्या शिक्षिका सौ वंदना मेश्राम, योगिता चंदेल आरती पलांदुरकर व क्रीडा प्रशिक्षक मुकुल बिल्लोरे ह्यांनी विशेष मेहनत घेतली व शाळेतली विद्यार्थी विद्यार्थिनींनी अथक परिश्रमातून ही कलाकृती श्रवणीय केली.