- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पोलीस आयुक्त यांचे हस्ते पोलीस पाल्याकरीता पोलीस मुख्यालय येथे आयोजीत समर कॅम्प चे उद्‌घाटन सोहळा संपन्न

नागपूर समाचार :- पोलीस आयुक्तालय नागपुर शहर अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पाल्याकरीता पोलीस मुख्यालय नागपुर शहर येथे दि. १७.०५,२०२४ ते दि. ३१.०५.२०२४ दरम्यान पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे संकल्पनेतुन पोलीस पाल्यांना त्यांचेमधील उपजत गुणांना वाव मिळावा यासाठी पोलीस मुख्यालय नागपुर शहर. येथे समरकॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्यामध्ये वेगवेगळे ईव्हेंट गायन, झुंबा, अनार्म कॉम्बॅक्ट, अॅथेलेटीक्स, फुटबॉल, व्हालीबॉल, कबडडी, योगा, पेंटींग, व ईतर ईव्हेंट आहेत. त्यासंबंधाने दि. १७.०५.२०२४ रोजी १८.०० वा. ने सुमारास अलंकार सभागृह पोलीस मुख्यालस नागपुर शहर येथे पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे अध्यक्षतेखाली समर कॅम्पचा दिप प्रज्वलीत करून उद्‌द्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला.

सदर उद्‌द्घाटन सोहळयात पोलीस आयुक्त यांनी उपस्थीत पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे पाल्यांना सदर समर कॅम्पमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेवुन वैयक्तीक कामगीरी करणे बाबत मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमात सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उपायुक्त गुन्हे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, यांनी उपस्थीत राहुन पोलीस पाल्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

सदर समर कॅम्पचे उ‌द्घाटन सोहळ्याचे सुत्र संचालन स. फौ. संजयसिंह ठाकुर तसेच प्रास्ताविक श्वेता खेडकर पोलीस उपायुक्त विशेष शाखा, व शालीनी ठाकुर सहा. पोलीस आयुक्त प्रशासन यांनी आभार प्रदर्शन केले. सदर समरकॅम्प सोहळयामध्ये पोलीस अधिकरी अंमलदार व त्यांचे परिवाराचे सदस्य जास्त संखेने हजर होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांनी पोलीस पाल्यांमध्ये प्रत्यक्ष जावुन मुलांना पुष्पगुच्छ देवुन प्रोत्साहीत करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *