- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डिजीटल रामायण तरुणांना आकर्षित करेल – केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना विश्वास

नागपूर समाचार :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण झालेले डिजिटल रामायण लोक मनापासून स्वीकारतील. यातील विवेचन विशेषत्वाने तरुणांना आकर्षित करेल आणि त्यांच्यात रामायणाबद्दल ओढ निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘सेफ शॉप डायरेक्ट दिल से’ या समूहाच्या वतीने आयोजित डिजिटल रामायणाच्या प्रकाशन सोहळ्याला ना. श्री. नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्सिस्टंट सभागृहात झालेल्या या सोहळ्याला डीएमपी प्रा. लिमिटेडचे संचालक योगेश वाधवा, प्रा. गिरीश देशमुख, संजय जैन, जीवन मगर, विवेक सुरानी, कंवलजीत उपस्थित होते. प्रभू श्रीरामचंद्रांचे विचार प्रभावीपणे पोहचविणारे हे माध्यम ठरेल, असे गौरवोद्गारही ना. श्री. गडकरी यांनी काढले. ते म्हणाले, ‘प्रभू रामचंद्रांना अहंकाराचे ज्ञान होते, तर रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. प्रत्येकालाच आपला राजा, मुलगा, भाऊ रामासारखा हवा असतो. याच रामाच्या आयुष्यावर आधारित रामायण डिजिटल स्वरूपात यावे, ही बाब कौतुकास्पद आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *