उमरेड समाचार -: दिनांक 20/06/24 ला रोज गुरवार ला मौजा सुरगाव ता. उमरेड येथील खसरा क्र. 193 मधील 16.28 हे. आर. जागेपैकी 1.00 हे. आर. जागा कत्तलखान्याकरिता मागणी करण्यात आलेली आहे यामुळे तेथील वातावरण दूषित होईल तसेच निरपराध गुरांचा नाहक बळी जाईल तसेच वातावरण दूषित होऊन लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. या सर्व बाबींचा विरोध म्हणून नागपूर ग्रामीण वारकरी संप्रदायने माजी आमदार श्री राजूभाऊ पारवे यांना निवेदन सादर केले. मा. आमदार महोदयांनी ही प्रक्रिया सुरु झाली असताच जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे कत्तलखण्याची परवानगी नाकरण्यात यावे या करीता पत्र व्यवहार केला आहे.
तसेच मा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांना सुद्धा पत्रा द्वारे कळविण्यात आले आहे. व वारकरी संप्रदाय समूहाला सूचित करण्यात आले की माझ्या विधानसभा क्षेत्रातच नाही तर नागपूर जिल्ह्यात कुठे ही कत्तलखाना सुरु होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी श्री. ओमदेव चौधरी महाराज, श्री. शंकर कावळे महाराज, श्री. दामू फाये महाराज, श्री. नाना गिरसावळे महाराज, श्री. विजय सहारे, श्री. धीरज गोमासे, श्री. हेमंत कुबडे, श्री. कुलदीप गंधे आदी संप्रदायचे प्रचारक उपस्थित होते.