नागपुर समाचार : किशोर कन्हेरे इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्याची घोषणा पाच वर्षा अगोदर सरकारने केली होती.२०२४-२०२५ विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निधी ची तरतूद करूण वसतिगृह सुरू करावी अश्या प्रकारचे निवेदन महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.
ओबीसी विभागामार्फत वसतिगृह सुरू करण्यासंबंधीचे वेळापत्रकानुसार ५ मार्च २०२४ पासून ओबीसी वसतिगृह सुरू व्हायला पाहिजे होती. शासना कडून काहीच हालचाली होतांना दिसत नसल्याने ओबीसी विद्यार्थ्यांनमध्ये चिंतेचे वातावरण आहे.२०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ओबीसी साठी ७२ वसतिगृह उभारण्याचे जाहीर केले होते.
त्या नंतर २०२१ साली वसतिगृह सुरू करण्याबाबत घोषणा करण्यात आली. राज्यात महायुतीचे सरकार बनुन दोन वर्ष झाली तरी वसतिगृह सुरू झाली नाही. २०२४-२५ शैक्षणिक सत्र सुरू होत असताना ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व त्यांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर वसतिगृह सुरू करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.