- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 108 प्रकरणांची नोंद; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 02) रोजी उपद्रव शोध पथकाने 108 प्रकरणांची नोंद करून 46 हजार 700 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 50 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 1 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने / जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत टेस्ला रेसिडेन्सी गोपाल नगर, अजयई फ्लाट्स बिल्डर्स लक्ष्मीनगर धरमपेठ झोन अंतर्गत वीआयपीएल कन्सट्रशन्स श्रधानंदपेठ आणि हनुमाननगर झोन अंतर्गत शिव चरण डेव्लपर्स गणेश नगर नंदनवन रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या चार प्रतिष्ठानांकडुन एकुण 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सिताराम अपार्टमेंट लक्ष्मीनगर सी व डी रस्त्याच्या कडेला टाकणेबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत एडिफॉय किड्स प्ले स्कुल मानव सेवा नगर काटोल रोड परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 06 प्रकरणांची नोंद करून 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *