- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : लाडकी बहीण योजनामुळे महिलांवर होणाऱ्या मानसिक अत्याचारातून दिलासा द्यावा – ॲड. नंदा पराते

नागपुर समाचार : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या शासनाने अटी व शर्ती ठेवल्या आहेत. नागपुरात अशिक्षित, गरीब, शेतमजूर, घरकाम करणाऱ्या मोलकरीण व मजूर असलेल्या महिलांना या जाचक अटीची पूर्तता करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर २ ते ३ महिने लागू शकतात. महायुती सरकारच्या निर्णयामुळे दि. १५ जूलै २०२४ पर्यंत मजूर, हातकाम/घरकाम करणारे, शेतमजूर, लहान शेतकरी महिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अर्ज करता येणार नाही त्यामुळे महायुती सरकारची मुदत फसवी आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने नागपूर शहर महिला कॅाग्रेसच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात संगीता उपरीकर ,वंदना मेश्राम ,सुरेखा लोंढे, मंदा बोबडे, राजकुमारी फोपरे ,रेखा बरवड ,मंदा शेंडे, मंजू पराते,,गिता हेडाऊ,शकुंतला वठ्ठीघरे,माया धार्मिक,अनिता हेडाऊ, ज्योती जारोंडे,जयश्री धार्मिक, किरण अड्याळकर,पुष्पा शेंडे यांच्या शिष्टमंडळाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेला ३ महिन्यापर्यंतची मुदत वाढविण्यात यावी व अर्जासाठी असलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करावी यासंबंधी निवेदन देण्यात आले.

महिलांना अर्ज करण्यासाठी प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास होत असून या योजनाची दि. १५ जूलै २०२४ पर्यंत ही शेवटची असल्याने महायुती सरकारकडून महिलांवर अत्याचार करण्याचा प्रकार आहे म्हणून बीजेपी महायुती सरकारचा महिला काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. माझी लाडकी बहीण या योजनेचा गरीब कुटुंबातील महिलांना खरोखरच फायदा द्यावयाचे असेल तर कुटूंबाचे राशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, तलाठीचे उत्पन्न व रहीवासी दाखला या कागदपत्रावर अर्ज स्विकारण्यात यावे. अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्र हे १५ जुलैपर्यंत सक्षम अधिकाऱ्याकडून महिलांना मिळूच शकणार नाही म्हणून लाखों महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे.

प्रशासनाकडून महिलांवर जाचक अटीप्रमाणे कागदपत्रे सादर करण्याचे मानसिक दबाव वाढविल्याने ही योजना महिलांसाठी फसवी असल्याचे स्पष्ट होते आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची महायुती सरकार महिलां सोबत जुमलेबाजी करून फसवणूक करीत आहे. अर्जासाठी जाचक अटी व पात्रतेचे अन्यायकारक निकष लावले आहे म्हणून महिला काँग्रेस कडून महायुती सरकारचानिषेध करण्यात येत आहे.

महायुती सरकारने महिलांना अर्ज करण्यासंबंधात मुदतवाढ व जाचक अटी रद्द करण्याचे आदेश त्वरित द्यावे अन्यथा येत्या विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारला महिलांना झालेला मानसिक अत्याचाराचा परिणामास समोर जावे लागेल. असा इशारा नागपूर शहर (जिल्हा) महिला काँग्रेस अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळातील संगीता उपरीकर,वंदना मेश्राम,सुरेखा लोंढे,मंदा बोबडे, राजकुमारी फोपरे ,रेखा बरवड,दिपाली अड्याळकर,मंदा शेंडे, मंजू पराते,गिता हेडाऊ,शकुंतला वठ्ठीघरे,माया धार्मिक,अनिता हेडाऊ, ज्योती जारोंडे,जयश्री धार्मिक, किरण अड्याळकर,पुष्पा शेंडे वैशाली अड्याळकर यांच्यासह शकडो महिलांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *