आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. ०४ रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) अनुसूचित जातीचे शहर अध्यक्ष प्रवीण जनबंधू व समाजसेवक संजय नेहरोत्रा यांचेसह असंख्य महिला व युवतींनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०४ जुलै २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रीय मिल मजूर संघाचे सदस्य प्रवीण चौधरी, रूपाली क्षीरसागर, जवेरीया शेख, आचल सुरकार, मयुरी कुडमेथे , अश्विनी भोयर, समीक्षा भोयर, त्रिक्षा राऊत, तारा क्षीरसागर, नयना भोंगाडे, लक्ष्मी सोयाम, सायली जामकुटे, रूपाली जामकुटे, प्रीती सुरकार, सुनिता सोनटक्के, शुभांगी वानखेडे, तनिष्का वानखेडे ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह जिल्हा भाजपा उपाध्यक्ष किशोर दिघे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, जिल्हा महामंत्री भाजपा आकाश पोहाणे, भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेश सचिव रवी उपासे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा छाया सातपुते, भाजपा जिल्हा सरचिटणीस आशिष पर्बत, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, अमोल त्रिपाठी, अनिता मावळे, सुभाष कुंटेवार , दिनेश वर्मा, रवी रोहनकर, अमोल खंदार, श्याम भीमनवार, शंकर मुंजेवार , समाजसेवक सुनील डोंगरे, रवीला आखाडे, शुभांगी डोंगरे , राजू गंधारे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.