दिव्यांगचा मदतीसाठी सदैव तत्पर – आ.विनोद अग्रवाल
गोंदिया समाचार : गोंदिया येथील पंचायत समिती मध्ये आ.विनोद अग्रवाल यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ८३ दिव्यांग मुलांना या शिबिरातुन साहित्य वाटप करण्यात आले असून त्यात २५ मुलांना शैक्षणिक साहित्य, २५ मुलांना व्हील चेयर, ४ मुलांना ट्रायसिकल, ४ मुलांना रोलेटर व २५ मुलांना कमोड चेयर वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अभियानातील जिला समन्वयक दिव्यांग विभाग विजय ठोकने यांच्या मार्फत साहित्य वाटप करण्यात आले असून आ.विनोद अग्रवाल यांनी अपंग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांचे कौतुक करून त्यांच्याबद्दल ते म्हणाले मोठ्या आजाराने त्रस्त असतानाही ते अपंगांची सेवा करत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ते जवळपास 15 वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग मुलांची सेवा करत असून त्यांची सेवा वाखाणण्याजोगी आहे. यावेळी सर्वांना संबोधित करताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, मी सभापती असताना गोंदियात महाराष्ट्रातील पहिले अपंग चिकित्सा केंद्र सुरू केले.अशी माहिती आ.विनोद अग्रवाल यांनी उपस्थित असलेल्या सर्व जणाना संबोधित केले.
कार्यक्रमामध्ये पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले म्हणाले की, जनतेचे आमदाराने “सबका साथ सबका विकास” या संकल्पनेतून दिव्यांगांसाठी खूप चांगले काम केले आहे सध्या दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्य आणि व्हील चेअर, रोलेटर, ट्रायसायकल, कमोड चेअर या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. ते सर्वसामान्यांच्या भल्यासाठी कार्य करतात आणि काम करण्यावर विश्वास ठेवतात, असे पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले यांनी सांगितले.
दरम्यान आ.विनोद अग्रवाल सभापती मुनेश रहांगडाले, विजय ठोकने जिला समन्वयक, गट विकास अधिकारी आनंद पिंगले, गट शिक्षणाधिकारी समरीत दीपाताई चंद्रिकापुरे जिप सदस्य, शैलजाताई सोनवाने प.स. सदस्य, मंजूताई डोंगरे प.स.सदस्य, कनीराम तावाड़े प.स.सदस्य, बाबा चौधरी संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति, गोंदिया, रामदयाल रहांगडाले, चित्रसेन डोंगरे, व अन्य पंचायत समिती येथील पदाधिकारी व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.