- Chif editor - Wasudeo Potbhare

परमात्मा एक : भगवंता, तुझ्या कृपेला पान्न कर

परमात्मा एक : आपण असे पाहू की की भगवत नामात प्रेम येण्याकरिता एक-एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने, सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे. म्हणून, जरून तर बळजबरीनेसुद्धा घेत राहणे, हे सुलभ. समजा एक यंत्र आहे, त्यात पुष्कळ चक्रे आहेत, आणि यंत्र चालू करण्याचा – हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करु म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ (बटन) आपण दाबली, तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल. 

त्याप्रमाणे, भगवत नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरुपी सर्व चक्रे एकदम फिरु लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून, हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे – अशी जयाची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना – भगवंताचे नाम घ्यायला लागावे. नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच, मग भगवत नाम घेणचा जर निश्चय केला तर का नाही होणार? काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे? म्हणून कोणत्याही तन्हेच्या शंका-कुशंका न घेता, कशाही तन्हेने पण भगवत नाम घेत राहावे हे उत्तम, महणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही.

जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू आपण पहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याश्या वाटतात, आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून भगवंताजवळ आपण अशी प्रार्थना करावी की, भगवंता, मोहक वस्तु मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. भगवंता, माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी एको, त्याचेच मला स्मरण होवो, आणि त्याचीच मला गोडी लागो. प्रल्हाद, द्रौपदी, यासारख्या भक्तांनी भगवंताजवळ काय मागितले? तेच आपण मागावे, आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपण ठेवावी. 

त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते, तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असतांना प्रथम चुका होतील, पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा, भगवंता, मी फार दोष, अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर भगवंत कृपा करीलच. मुखाने भगवत नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, आणि अंतःकरणात समाधान ठेवावे. जो भगवत नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते.

नमस्कार……..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *