- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आंतरराष्ट्रीयवाघ्र दिनानिमित्य एशियाटिक बिग कैट सोसाइटी व रोटरी एलीट चा संयुक्त उपक्रम

नागपूर समाचार : वाघ हा नैसर्गिक परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थनावर असून वाघाचे संवर्धन म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन असल्याचे प्रतिपादन वनसंरक्षक आयएफएस अधिकारी भरतसिंह हाडा यांनी केले. आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनानिमित्त आज 29 जुलै 2024 रोजी रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईट आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी तर्फे घोषवाक्य आणि बॅनर स्पर्धेचं आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थतितांना संबोधित करत होते. शहरातील सिविल लाईन्स इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नजीक असलेल्या वाघांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे सचिव अजय पाटील, रोटरी क्लब नागपूर एलिटच्या अध्यक्ष डॉ सुषमा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

केवळ वाघांचे संरक्षण नव्हे तर एकूणच वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची गरज भरतसिंह हाडा यांनी बोलून दाखविली. व्याघ्र गणना कशी होते, त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कशी जोखीमयुक्त कामे करते यावर देखील त्यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. लाखो लोक आणि कॅमेरे या कामात लागतात असे त्यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी यांनी देखील व्याघ्र संवर्धनाबाबत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

सुरवातीला एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे सचिव अजय पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून वाघ संवर्धनाचे महत्व सांगितले. याशिवाय एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या तर्फे घेण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल सांगितले. वाघ सुरक्षित असेल तर पर्यावरण आणि एकूणच परिसंस्था सुरक्षित राहील यावर त्यांनी भर देत आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. नागपूर टायगर कॅपिटल असल्याने अश्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जगरूकता निर्माण करण्याचा उदेष्य त्यांनी बोलून दाखवला.

यावेळी सेंट उर्सुला शाळेच्या क्रिशीता हिच्या पोस्टरला पहिले पारितोषिक देण्यात आले तर सेंटर पॉईंट शाळेच्या आनंदिताला दुसरे पारितोषिक देण्यात आले. छत्रीवर व्याघ्र संवर्धनाच संदेश देणाऱ्या सेंटर पॉईंट शाळेच्या काव्यांशला विशेष बक्षिस देऊ करण्यात आले. सेंटर पॉईंट शाळेच्या दिव्यांशी आणि गुरनित यांना देखील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभंकर पाटील , ममता जैस्वाल, सेंटर पॉइंट शाळेच्या आसावरी मॅडम , क्लब सेक्रेटरी प्रमोद मिसाळ, हरविंदर सिंह मुल्ला, शिल्पाली भालेराव, सायली पट्टीवार, प्रीती पाटील, मनीष जैस्वाल, मनीष धोटे , राजू अस्वले, वर्षा सिंह परिश्रम घेतले.

पावसाची रिपरिप आणि शाळकरी मुलांचा उत्साह!

नागपुरात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरु असताना देखील विविध शाळांचे विद्यार्थी पोस्टर, बॅनर घेऊन ‘ वाघ बचाओ -पर्यावरण बचाओ’ च्या घोषणा देताना दिसून आले. याशिवाय कल्पक संदेश आणि चित्र असलेले पोस्टर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. ‘बाघ जंगल कि जान है और भारत की शान है’ ‘हियर देयर रोअर ,ऍज दे वूड बी नो मोर’; ‘स्पिक अप फॉर टायगर्स’ अशी कल्पक पोस्टर आणि घोषवाक्य यावेळी दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *