- Breaking News, क्राईम खबर , नागपुर समाचार

नागपूर/कामठी समाचार : नागपुरातील कामठी येथे 50 वर्षीय व्यक्तीने केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

नागपूर/कामठी समाचार : शहरातील कामठी परीसरात खलासी लाईन येथे एका 50 वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या ८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदेश धनीराम वासनिक (५०) रा. खलासी लाईन, कामठी हा मंगळवारी रात्री घरी एकटाच होता. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय पीडितेला त्याने खाऊ घेऊन देण्याच्या बहाण्याने बोलावले.

मात्र, आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीने रडत घरी जाऊन घडलेला प्रकार आईला सांगितला.आईने मुलीला पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. जुने कामठी पोलिसांनी बीएनएस आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *