- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : कान्होबा विसर्जनाकरिता मनपाकडून कृत्रिम टँकची व्यवस्था

नागपूर समाचार : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घराघरात स्थापन करण्यात आलेल्या कान्होबाच्या विसर्जनाकारिता नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध तलाव परिसरात कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मनापाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात व मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्याद्वारे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने मनपा झोन निहाय श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम टँक आणि निर्माल्य कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे लक्ष्मीनगर झोन अंतगर्त येणाऱ्या सोनेगाव तलावाजवळ एक, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या शुक्रवारी तलावाजवळ दोन, नेहरूनगर झोन अंतगर्त येणाऱ्या सक्करदरा तलावाजवळ पाच, गांधीबाग झोन अंतगर्त येणाऱ्या महाल, मातृसेवासंघ जवळ येथे एक, सतरंजीपुरा झोन अंतगर्त येणाऱ्या मनोज हॉटेल, नाईक तलावाजवळ एक, हनुमानघाट जवळ एक, नाईक तलाव गार्डन गेटजवळ एक, लकडगंज झोन अंतगर्त येणाऱ्या नागपूरे हायस्कुल, भरतवाडा येथे एक, गुलमोहर नगर हनुमान मंदिरजवळ येथे एक अशा ठिकाणी कृत्रिम टँक व निर्माल्य कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *