- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महिलांना सक्षम बनविणारी ‘..लाडकी बहीण योजना’ कायमस्वरूपी राहावी  

नागपूर समाचार : प्रामाणिक प्रयत्नाने पुढे जाणाऱ्या महिलांना उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून केले आहे, अशा भावना बहुतांश महिला व्यक्त करीत आहेत. याचेच उदाहरण शोभून दिसाव्या अशा नागपुरच्या कामठी परिसरातील येरखेडा येथील नीलिमा शेंदरे यांचा हा स्वानुभव.

मनातील इच्छा कधीतरी पूर्ण होतील तरी का! हा भाबळा नकारात्मक आशावाद घेवून जगणाऱ्या माझ्या सारख्या सर्वसामान्य महिलांचा भ्रम या योजनेच्या माध्यमातून तुटला आहे. महिलांना छोट्या- छोट्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी या योजनेच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्याची काळजी घेण्याकरिता ही मदत उपयुक्त ठरणार आहे. आम्हा बहिणींना २ महिन्यांचा एकूण ३००० रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी राखीच्या पूर्व संध्येलाच भेट दिल्याने खूप आनंदी आहोत. भविष्यातही ही योजना अशीच सुरू राहावी ,ज्यामुळे आम्हाला आधार व आमच्या पंखांना बळ मिळेल अशा, नीलिमा यांच्या प्रांजळ भावना म्हणजे त्यांच्या सारख्या अनेक होतकरू महिलांचा प्रातिनिधिक आवाजच ठरला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *