- Breaking News, Meeting, नागपुर पुलिस, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथे ‘ईद-ए-मिलाद २०२४” सणानिमित्त समन्वय बैठक संपन्न

नागपूर समाचार : “ईद-ए-मिलाद २०२४” निमीत्ताने दिनांक ०५.०९.२०२४ से ११.३० वा. चे सुमारास, पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरियम हॉलमध्ये रविंद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे अध्यक्षतेखाली अश्वती दोर्जे सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, अपर पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत शरीतुल नयी कमीटी सोबत समन्वय बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.

पोलीस आयुक्त यांनी बैठकीचे महत्त्व समजावुन उपस्थितांना येणाऱ्या ईद-ए-मिलाद सणानिमीत्त सर्वांनी शांतता व सलोखा अचाधीत ठेवुन कोणाच्याही भावना न दुखावता, वाहतुक व ध्वनी नियमांचे पालन करून सण साजरा करावा असे सुचविले, तसेच उपस्थित कमीटीच्या सदस्यांच्या अडीअडचणी समजुन त्यावर उपाययोजना व घ्यावयाची खबरदारी याबाबत तसेच, अंमली पदार्थ व त्याचे दुष्परीणाम याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यकमाचे सुत्र संचलन नरेंद्र हिवरे, सहा. पोलीस आयुक्त यांनी केले. श्वेता खोडकर, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, नागपुर शहर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी निमीत गोयल, अर्थात चांडक, राहुल मदने, निकेतन कदम, शशिकांत साप्तव पोलीस उप आयुक्त, नागपुर शहर, तसेच, पोलीस अधिकारी व अंमलदार व बहुसंख्येने शरीतुल नबी कमीटीचे सदस्य हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *