- Breaking News, PRESS CONFERENCE, आंदोलन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आपली बस कंत्राटी कामगार दिनांक 3 ऑक्टोंबर पासून बेमुदत संपावर जाणार

नागपूर शहराची बस सेवा खंडित होणार

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका अंतर्गत चालणाऱ्या नागपूर मनपा आपली बस सेवा दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 पासून बेमुदत बंद करण्याची म्हणजे संपाची नोटीस नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघ सलग्न भारतीय मजदूर संघ या संघटनेने नुकतीच मनपा आयुक्त यांना दिली असून येत्या 3 आक्टोंबर पर्यंत वेतन वाढी बाबत निर्णय न झाल्यास शहर बस चालविणारे कंत्राटी वाहन चालक व कंडक्टर व अन्य संबंधित कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सदर नोटीस देण्यात आलेली आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी वेतन वाढीच्या संदर्भात माननीय मनपा आयुक्त यांचे कार्यालयात माननीय आमदार श्री प्रवीण जी दटके संघटनेचे अध्यक्ष श्री नागेशजी सहारे तसेच भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री श्री गजानन गटलेवार जिल्हाप्रमुख श्री हर्षल ठोंबरे तसेच बस कंत्राटी कर्मचारी संघटनेचे महासचिव श्री कमलेश वानखडे यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत मागील दहा ते पंधरा वर्षापासून नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आपली बस चालविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीने अतिशय तूटपुंजे फक्त 12 ते 13 हजार रुपये देण्यात येत आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपले कुटुंब चालविण्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते या महागाईच्या काळात एवढ्या कमी वेतनामध्ये जीवन जगणे कठीण झाले.

याबाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी वेतन वाढीच्या संदर्भामध्ये मनपा प्रशासनासोबत बैठकी घेऊन विनंत्या केल्या आहे मात्र मनपा प्रशासनाला याचा कुठलाही फरक पडत नाही मात्र दुसरीकडे मनपा मध्ये अन्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वेतन वाढ देऊन त्या कर्मचाऱ्यांना मनपा प्रशासनाने न्याय दिला आहे तसेच नागपूर महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तंगीत असताना तात्कालीन आयुक्त श्री राधाकृष्णन यांनी तीन महिन्यांमध्ये महानगरपालिकेची आर्थिक स्थिती जागेवर आणतो तरी महानगरपालिकेच्या नियमित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास सभागृहाने मंजुरी द्यावी असे सभागृहात सांगितले होते सभागृहाने कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगास मंजुरी दिली मात्र आजही नागपूर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थिती जैसे थे आहे जर अशा माध्यमातून नागपूर महानगरपालिका सर्वच कर्मचाऱ्याऱ्यांना पगारवाढ देत आहे तर याचे स्वागतच आहे परंतु नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगारांना वेतन वाढ का देण्यात येत नाही.

कर्मचारी मागील दहा ते बारा वर्षापासून कार्यरत आहे व अतिशय तुटपुंज्या वेतनामध्ये हे कर्मचारी जीवन जगत आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतनाच्या आधारे वेतन वाढ देण्यात यावी अन्यथा येत्या 3 आक्टोंबर पासून नागपुरातील शहर बस सेवा बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा आज माननीय आमदार श्री प्रवीण दटके तसेच आपली बस कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री नागेश सहारे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री श्री गजानन गटलेवार जिल्हाप्रमुख श्री हर्षल ठोंबरे महासचिव श्री कमलेश वानखडे यांनी आजच्या बैठकीमध्ये मनपा आयुक्तांना दिला असून 3 ऑक्टोंबर कामगारांच्या वेतनवाढी बाबत सकारात्मक निर्णय झाल्यास नाईलाज असतो आम्हाला बेमुद्दत संपावर जावे लागेल अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस जबाबदार मनपा प्रशासन राहील याची नोंद घ्यावी. अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आली.

आजच्च्या पत्रकार परिषदेमध्ये श्री सुमित चिमोटे प्रवीण नरवणे, सोमेश्वर घुगल, निलेश पौनीकर, विक्कि चौधरी, संदेशजी डोंगरे, प्रवीण काटोले, संजय कळसकर, नरेंद्र निंबाळकर, विनोद सोनटक्के, विशाल राऊत हे कंत्राटी कर्मचारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *