- Breaking News, राजनीति

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सातेफळ येथील असंख्य पुरुष व महिलांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश

आमदार समीर भाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात युवा मोर्चा व भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज ०७ ऑक्टोंबर २०२४ हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सातेफळ येथील असंख्य पुरुष व महिलांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०७ ऑक्टोंबर २०२४ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने रंजना कातडे , माधुरी समुद्रकार, रुखमा दांडेकर, संध्या लांडगे, अनिता गाठे, आशा अमृतकार, कविता बोरकर, विना जवादे, वर्षा मेश्राम, चंद्रकला लांडगे, अर्चना लांडगे, संगीता कलोडे, वनिता आत्राम, वंदना भगडे, नयना चंदनखेडे, पद्माकर अंड्रस्कर, संतोष कलोडे, प्रमोद ढोरे , महादेव पावडे, सागर घोडे, शुभम मुजबैले ईत्यादीसह असंख्य पुरूष व महिलांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला.  

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला आमदार समीरभाऊ कुणावार यांचे सह भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद विटाळे, भाजपा ग्रामीण महिला तालुकाध्यक्ष कीर्ती सायंकार , माजी नगरसेवक वसंत पाल गुरुजी, चंदूभाऊ मावळे, सरपंच नितीन वाघ, सरपंच किशोर गुडधे, विकी राऊत, भूषण राऊत , किशोरजी अगडे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *