सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी खेळातील परंपरा जपली आणि राष्ट्रीय स्तरावर आपले नाव नोंदविले सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा- संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ. लता वाघ
नागपूर समाचार : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोखारा यातील फुटबॉल टीम ने तालुकास्तरच नव्हे तर जिल्हास्तरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा बाजी मारलेली आहे. राज्यस्तरावर फुटबॉल मॅच ही जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर येथील पन्हाळा या ठिकाणी झाली.
यामध्ये आलेल्या बाह्य परीक्षकांनी सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फुटबॉल खेळातील विशेषता बघून पाच विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर केली.यामध्ये फुटबॉल खेळाडू राजू काली टूडू, मोनोतोष मोण्डेल किसकु, जयदेव बायला बसके, आकाश रतन हंसदा, अनिमेश सावना सोरेन यांचा सहभाग आहे.
यामध्ये फुटबॉल खेळाडू शेमलाल मंत्री हंसदा,लखन संझला मरांडी, रुबीन सलकु हेम्ब्रोम, राजू काली टूडू, मोनोतोष मोण्डेल किसकु, फ्रान्सिस श्रीनाथ हंसदा,फिलिप जिसु टूडू, नयन विश्वनाथ मार्डी, जयदेव बायला बसके, आकाश रतन हंसदा, अभिजित शिबू सोरेन, अनिमेश सावना सोरेन, अलबिदा संतोष मुर्मू, ओम संजू लांडे, मार्शल उकील हेमरॉन, अरमान अंकुश सर्वरें यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ. लता वाघ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या तसेच उपमुख्याध्यापिका डॉ सुवर्णा जांभूळकर, विभाग प्रमुख किशोरी काकडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक उमेश देशमुख, विद्या गजभिये, इब्राहिम खान यांचे लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.