- Breaking News, Chif Reporter - Wasudeo Potbhare, उत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सरस्वती नगरात दसऱ्याच्या दिवशी अतिसुंदर रावण दहन कार्यक्रम संपन्न

नागपूर समाचार : दक्षिण नागपूर येथील बहुउद्देशिय सरस्वती नगर येथे दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबर ला शनिवारी सस्वरतीनगर च्या प्रागणांत अतिसुंदर रावण दहणाचा कार्यक्रम पार पडला.

सरस्वती नगरच्या प्रांगणात नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी करून जवळ -जवळ या ठिकाणी दोन ते तीन हजार लोकसंख्येची उपस्थिती होती.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरस्वती नगरच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे रावण दहणा चा कार्यक्रम अतिसुंदर आणि खूप छान प्रकारे होतो. या वर्षीही मोठ्या संख्येने वस्तीतील नागरिकांनी सहभागी होऊन आनंद लुटला.

दरवर्षीप्रमाणे रावणाचा आकार व उंची वाढत आहे. रावण दहणाचा कार्यक्रम सरस्वती नगरच्या बहुउद्देशीय संस्थे च्यावतीने करण्यात आला असून याप्रसंगी माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांच्या शुभ हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. मान्यवर अतिथीगण सुनील मानेकर यांची उपस्थिती होती. सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झालेला आहे. याप्रसंगी मंडळातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सर्व तरुण मित्र यावेळी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *