नागपूर समाचार : माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.