👉 मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज आहे- संचालिका प्राचार्य सौ लता वाघ
👉 सरस्वती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त छोटी चरित्रे पुस्तके वाटप
नागपूर समाचार : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोखारा तसेच सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यामानाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ लता वाघ मॅडम, मुख्याध्यापिका चंचल चौबे मॅडम, मुख्याध्यापक श्री विजयजी वनकर, उपमुख्याध्यापिका डॉ सुवर्णा जांभूळकर, विभाग प्रमुख किशोरी काकडे मॅडम, वक्त्या म्हणून लाभलेल्या स. शि पौर्णिमा वाकडे मॅडम यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलित केले याप्रसंगी वाचन पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेचा प्रचार व प्रसार यावर चर्चासत्र, विद्यार्थ्यांकडून विविध चरित्र कथा, सामान्य ज्ञान या विषयावरील पुस्तकांचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन देखील भरविण्यात आलेले होते.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ. लता वाघ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे व मराठी भाषेचे संवर्धन करून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा व जास्तीत जास्त लेखन सुद्धा मराठी भाषेतून करावे असे आवाहन केले त्याचबरोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे चरित्र पुस्तक वाचून त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे आकलन करावे व आपले व्यक्तिमत्व वृद्धिगत करावे असे विद्यार्थ्यांना या प्रसंगी सांगितले.
चर्चासत्र व व्याख्यान यामध्ये जयेश बिहाडे, रितिका वाघाडे, मनस्वी गहलोत, मिफ्रा शेख कार्तिकेय कोलमकर, अरमान सरवरे, गुंजन नागपुरे, सिद्धेश पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स . शि मंजू अग्रवाल तर आभार प्रदर्शन स . शि वंदना आमले यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.