नागपूर समाचार : बुलढाणा जिल्हा अंतर्गत सैलानी बाबा दरबार आहे. या दरबारात दर दिवसा तसेच होळी हा सण असो भक्तांची एकच गर्दी पाहायला मिळते. होळी हा सण सैलाणीला मोठ्या थाटा माटात साजरा होतो. आता वंश चालविणारे हजरत सुफी अब्दुल रहमान अली शाह नक्शबंदी साहेब यांनी ५ मार्च २०२४ रोजी नागपूर ला होळीचा कार्यक्रम घेतला. तर या कार्यक्रमात काही भक्तांना खिलाफत नामा देण्यात आला.
त्यातील एक नामे अखिल खान पठाण ताजबाग निवासी यांना सुद्धा ५ मार्च २०२४ रोजी खिलाफत नामा दिला होता. यांच्या कडून हा दिनांक ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी सर्व मानवाईक भक्तगणांसमोर हा खिलाफत नामा परत घेण्यात आला. अखिल खान पठाण यांनी कुठल्याही दबावाखाली न येता स्वखुशीने हजरत सुफी अब्दुल रहमान अली शाह नक्शबंदी साहेब यांच्या हातात दिला. खिलाफत नामा ची झेरॉक्स प्रत काढून जादूटोण्याच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे. असे निदर्शनास आल्यास हा खिलाफत नामा परत घेण्यात आला.
अखिल खान पठाण याच्याशी हजरत सुफी अब्दुल रहमान अली शाह नक्शबंदी साहेब यांच्याशी तसेच भक्तगणांशी काही संबंध राहिलेला नाही. भक्तांच्या सूचनेसाठी ही बातमी प्रसारित करण्यात येत आहे.