यवतमाळ समाचार : विदर्भ व मराठवाड्यातील अग्रणी असलेल्या दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेच्या उपाध्यक्षपदी अजिंदरसिंह मनोहरसिंह चावला यांची निवड झाली. यवतमाळ अर्बन बँकेच्या मुख्यालयात अध्यासी अधिकारी अर्चना माळवे व कार्यालय अधिक्षक राजेश ए. गुर्जर यांचे उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अजिंदरसिंह चावला हे मागील तीन वर्षापासुन बँकेच्या संचालक या पदावर कार्यरत आहे. तसेच विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागाचे विशेष संपर्क प्रमुख म्हणुन त्यांचेकडे सामाजिक दायित्व आहे.
मागिल २० वर्षा पासुन त्यांनी वाणिज्य विषयाचे अनेक विद्यार्थी घडविले असुन ते महाजन कॉलेज यवतमाळ येथे प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहे. अजिंदरसिंह चावला यांच्या निवडीचे सहकार क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असुन बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.