नागपूर समाचार : लोकसभा निवडणूक असो की संविधान सभेतील प्रवेश वा मंत्रीमंडळातील भूमिका अशा विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला. पंडीत नेहरूंनी तर त्यांचा संसदेत प्रवेश होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. याच गांधी कुटुंबीयांच्या कॉंग्रेसने मुंबई,भंडाऱ्यातून त्यांना पराभूत केले. एवढेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कारही गांधी कुटुंबीयानंतर दिला गेला एवढा अवमान केल्याचा आरोप भाजपचे राज्यसभेचे खासदार व उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक बृजलाल यांनी पत्रपरीषदेतून केला. ते नागपुरात रामदासपेठेतील भाजप मिडीया सेंटरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
बृजलाल म्हणाले, गेल्या निवडणूकीत नॅरेटिव्ह सेट केला गेला. संविधानाबद्दल चूकीचा भ्रम पसरविण्यात आला. संविधान बदलण्याची भाषा करण्यात आली. परंतु, यापुवींच सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या मुलभूत संरचनेत वा मुलभूत अधिकारात कोणताही बदल करता येऊ शकत नाही, एवढी स्पष्टता दिली आहे. त्यानंतरही कॉंग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे. याच संविधानाला नख लावण्याचे काम वारंवार कॉंग्रेसने केले आहे. तुष्टीकरणाचे राजकारण केले.
कॉंग्रेस सरकारने संसदेच्या केंद्रीय हॉलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र लावू दिले नाही. कॉंग्रेस आरक्षणविरोधी आहे, याचे नमुने बनारस व अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील दलित प्रवेशावर बंदीवरून स्पष्टपणे झळकते. 1961 मध्ये या दोन्ही विद्यापीठात दलित विद्यार्थ्यास प्रवेश दिला जात नव्हता. यावर केंद्र सरकारने निर्णय घेत शिक्षणाचा वाटा मोकळया करण्याच्या प्रयत्न केला. सीएए आणून केंद्रातील भाजप सरकार विस्थापीतांना नागरीकत्व देण्याच्या प्रयत्न करीत आहे. कॉंग्रेस त्यांना विरोध करीत आहे.
जोगेंद्रनाथ मंडल यांनी डॉ. बाबासाहेबांना संसदेत पाठविण्यासाठी बंगालमधून लढविले. त्याच बंगाल प्रांताचा तो भाग देशापासून वेगळा केला. जेणेकरून डॉ. बाबासाहेबांची खासदारकी संपावी, असा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी दलितांना न्याय दिला, असा दावा करीत खासदार बृजलाल यांनी कॉग्रेसने संविधानाशी प्रतारणा केली असा आरोप केला. हरीयाणात दलितांवर अन्याय केला. तरीही भाजप सत्तेत परतली. झारखंडमध्ये नुकताच जाऊन आलो. तेथेही भाजप चांगल्या स्थितीत आहे. महाराष्ट्रातही भाजपची महायुती बहुमताने सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला. पत्रपरीषदेला मध्यप्रदेशचे आमदा राजेश सोनकर, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी, सुभाष पारधी, अॅड. राहूल झांबरे उपस्थित होते.