नागपूर समाचार : नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ पूर्व नागपूर मतदारसंघातील परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत संवाद साधला. चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी, ठीकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी अशा उल्हासित वातावरणात सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांनीमहायुतीच्या विजयासाठी ‘वज्रमूठ’ बांधली आहे.
या पदयात्रेत महिला तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ महिलांनी औक्षण करीत, शंकर जगताप यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांना मनापासून विजयासाठी आशीर्वाद दिला. या अनोख्या स्वागताने मन भारावून गेले होते. परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी निवडणूक पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.