- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर/कोराडी समाचार : महायुतीचा प्रचार न करणाऱ्यांवर कारवाई होणार – चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा 

राहुल गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विरोधी

नागपूर/कोराडी समाचार : बंडखोरी करणाऱ्या ४० भाजपा पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही जे पदाधिकारी पक्षविरोधी कार्य करीत मित्रपक्षाचा प्रचार करणार नाही किंवा मित्र पक्षाच्या उमेदवार सोडून दुसऱ्या पक्षासाठी प्रचार करतील. अशा भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा थेट इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भाजपा कार्यकर्त्यांसाठी पक्ष हा आईसमान असून त्यासोबत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाष्य केले. ते म्हणाले, राहुल गांधी बंद दाराआड चर्चा करीत आहेत. त्यांना मीडिया देखील नको आहे. त्यांचा प्रयत्न जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आहे. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला सहकार्य करण्यासाठी, राष्ट्रविरोधी कारवाईचे समर्थन करण्यासाठी ते आले असून, कॉंग्रेसने ८० वेळा संविधानात बदल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसने केले. कॉंग्रेसला कधीच बाबासाहेबांचे विचार रुजले नाही. राहुल गांधी बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधी असून ते आता संविधानाच्या गोष्टी करीत आहेत. 

ते असेही म्हणाले… 

•   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणीला वर्षाला २५ हजार रुपये देण्याचे ठरविले आहे, आता १८ हजार मिळत आहेत. त्याच प्रमाणे दिव्यांग, निराधारांना २१०० रुपये महिना मिळणार आहे.

•   ऊद्धव ठाकरे यांचा अजेंडाच महाराष्ट्रात आलेल्या प्रकल्पांना विरोध करणे हाच आहे. यामुळे ते  महाराष्ट्राचे नुकसान करत आले आहेत.

•   राज ठाकरे यांनी विदर्भाच्या मागसलेपणावर त्यांचे मत मांडले असले तरी १० वर्षांपूर्वीचा विदर्भ आणि आजचा विदर्भ यात बदल झाला आहे. काँग्रेसचे ४५ वर्ष आणि आमचे दहा वर्ष यात मोठा बदल झाला.

•   शरद पवार यापूर्वीही ते पावसात भिजले आहे, कधी सहानुभूती कार्ड खेळले आहे, मात्र जनता आता या सहानुभूती वर जाणार नाही. महायुतीने केलेल्या कामाकडे जनता लक्ष देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *