केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर समाचार : मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन’ चे आज, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री. मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, माफसू नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे सीईओ विक्रम वाघ, क्रॉप केअर फेडरेशनचे अध्यक्ष दिपक शहा, कार्पोरेट रिलेशन्स अॅड अलायन्स टॅफे टॅक्टर्सचे समूह अध्यक्ष टी. आर. केसवन व मदर डेअरीचे प्रबंध संचालक मनीश बंदलीश यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.
उद्घाटनानंतर मुख्य सभागृहात 12 वाजता ‘विदर्भातील दुग्धव्यवसाय वाढीच्या संधी’ विषयावर महत्वाची परिषद होईल. भारतातील कृषी उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या, संशोधन संस्था, सरकारी विभाग, विविध राज्ये, कृषी विद्यापीठे, प्रगत कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि सेवा क्षेत्रातील आघाडीच्या संस्थाचा यात सहभागी राहणार आहे. आयआयटी खरगपूर, एफटीपीआयचे स्टार्टअप्स तसेच, माहिती तंत्रज्ञानाचे स्वतंत्र स्टॉल्स राहणार असून ड्रोनची प्रात्यक्षिके देखील बघायला मिळतील.
शेतकरी, उत्पादक, ग्राहक, कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमींनी ॲग्रोव्हिजनला भेट द्यावी तसेच, शेतकऱ्यांनी कार्यशाळा व परिषदांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, आयोजन सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर व समिती सदस्यांनी केले आहे.