महाराष्ट्र समाचार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडलं, हे आज समजणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे.
महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये मविआपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या होत्या. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या. अपक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सकाळी झालेल्या फेऱ्यांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून बहुमतापेक्षाही अधिकचा जागा गाठला आहे. भाजपाने २०१९ पेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर मविआ पिछाडीवर आहे.