- Breaking News, नागपुर समाचार

उमरेड समाचार : माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे भेट दिली

उमरेड समाचार : मंगळवार दिनांक 10/12/2024 ला माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे भेट दिली. 40 कोटी रुपयाचे बजेट मध्ये मंजुरी करिता उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारती करीता जागेची पाहणी करून अंदाज पत्रक बनविण्याकरिता मार्गदर्शन केले.

येणाऱ्या काही दिवसा आधी उमरेड येथे नवीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. त्या रुग्णालयात 50 खाटा बसतील अशी व्यवस्था होणार आहे. येणाऱ्या दिवसात उमरेड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना नागपूर ला जाण्या अगोदर उमरेड येथे उपचार मिळणार आहे.

आज सर्व अधिकारी सोबत पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले. यावेळी निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर, प्रभाकर वंजारी वैद्यकीय अधिकारी, PWD अभियंता प्राजक्ता जुनघरे, अभियंता सुहास बोकडे, डॉ, शरीष मेश्राम बाल रोग तज्ञ, डॉ. खंडाते या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *