- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : तळागाळातला प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत व्हावा – नितीनजी गडकरी

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे पद्मश्री काजोल यांच्या हस्ते थाटात उद्घाटन 

नागपूर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश केवळ मनोरंजन करणे हा नसून समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंस्कृत व्हावा,हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांनी येथे केले. 

नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्या नवव्या पर्वाला आज, शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून संबोधित करीत होते. 

हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात कलागुणांचा संगम असलेल्‍या या प्रसिद्ध महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्कार भारती च्या अध्यक्ष कांचन गडकरी, ह्युंदाई सीडी चे जिओलिक ली, पूनित आनंद, महिंद्रचे अभिजित कळंब, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, माजी खा. दत्ता मेघे, सर्व आमदार चरणसिंग ठाकूर, प्रवीण दटके, कृष्णाजी खोपडे, कृपाल तुमाने, डॉ गिरीश गांधी, ना गो गाणार, सुलेखा कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, जितेंद्र बंटी कुकडे व इतर प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते काजोल यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.

नितीन गडकरी यांनी काजोल यांची आजी प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ आणि पती अजय देवगण यांचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला व महोत्सवाला हजेरी लावल्याबद्दल आभार मानले. 

ते नंतर म्हणाले की, केवळ मनोरंजनच नाहीतर जनतेची सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व परंपरागत मूल्ये कला व लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचावी हा या महोत्सवाचा हेतू आहे. रस्ते, वीज, दळणवळण यासोबतच साहित्यिक व सांस्कृतिक दर्जा वाढल्यानंतरच शहराचा विकास होतो. अनेक कलाकारांच्या उपस्थितीने हा महोत्सव फुलतो व प्रतिष्ठेचा होतो. यंग टॅलेंटला वाव देणारा हा उत्सव जनतेच्या आवड व आनंदाचा ठेवा आहे, असे उद्गार गडकरी यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ऍड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *