- Breaking News

नागपूर समाचार : संस्कार भारती तर्फे – ‘मैं हूं भारत!’

नागपूर समाचार : महोत्‍सवाचे उद्घाटन झाल्‍यानंतर संस्‍कार भारती, नागपूर तर्फे ‘मैं हूं भारत’ हा भारतीय इतिहासाची गौरवशाली गाथा विशद करणारा व बाराशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम झाला. वेदकाळापासून आज पर्यंतचा भारताचा प्रदीर्घ इतिहास भक्तिगीते, देशभक्तीची नवी गीते, शास्त्रीय व लोकनृत्य, पोवाडा, गोंधळ अशा विविध कलाप्रकारांतून यावेळी उलगडला गेला.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन गजानन रानडे, अमर कुळकर्णी आणि आनंद मास्टे यांचे होते. दीपाली घोंगे, मंगेश बावसे, सारंग मास्टे, अभिषेक बेल्लारवर यांनी नाट्य तर अवंती काटे, कुणाल आनंदम् यांनी नृत्य विभागाचे संयोजन केले. नेपथ्य सुनील हमदापुरे यांचे होते. शंतनु हरिदास, प्रसाद पोफळी, नीरज अडबे, आसावरी गोसावी, श्रीकांत बंगाले, अभिजीत बोरीकर, संजय खनगई, अक्षय वाघ, प्रदीप मारोटकर, मनोज श्रोती कार्यक्रम समन्वयक होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारतीचे नागपूर महानगर अध्यक्ष वीरेंद्र चांडक, कार्याध्यक्ष डॉ. मृणालिनी दस्तुरे आणि शहर मंत्री मुकुल मुळे यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *