▪️ खासदार सांस्कृतिक महोत्सवात भक्तीचा जागर
▪️ हुडहुडी भरविणार्या थंडीत भक्तांची लक्षणीय उपस्थिती
नागपूर समाचार : हुडहुडी भरविणार्या आणि भक्तांच्या लक्षणीय उपस्थितीत रविवारी श्रीरामरक्षा स्तोत्राचे सलग १३ वेळा आणि त्यानंतर मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले. सकाळच्या सत्रात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. आजच्या दुसर्या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात देवेश्वर शास्त्री आर्वीकर यांच्या मार्गदर्शनात रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचे पठण संपन्न झाले
मुख्य अतिथी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे महंत भागीरथी महाराज, विहिंपचे सहमंत्री राजू पवनारकर, महामंत्री नीलकांत गुप्ता आणि संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक‘माच्या प्रमुख संयोजिका श्रद्धा पाठक यांनी योगाचार्य रामभाऊ खांडवे यांचा सत्कार केला. सोमूजी देशपांडे, अलोक घाटे, प्रतिभा दटके, संजय कोतवालीवाले, सीमा घाटे, इत्यादी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना विहिंपचे महंत भागीरथी महाराज म्हणाले, भारताने कधीही स्वतः पुरता विचार केला नाही. तर या देशाने नेहमीच विश्वमांगल्याची कल्पना केली. प्रभू श्रीराम देखील विश्वकल्याणाचा मार्ग दाखवतात. श्रीरामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठण हे पावन पुनीत असून त्यातून सकारात्मकता उत्सर्जित होते असे त्यांनी सांगितले. प्रारंभी सहजयोग संस्थेतर्फे योगाभ्यास घेण्यात आला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात योगाभ्यास आणि ध्यानाची छोटी प्रात्यक्षिके घेण्यात आली. कार्यक्र‘माचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.