▪️ केंद्रीय मंत्री गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रमाला प्रचंड गर्दी
नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला रविवारी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली हाेती. खामला चाैकातील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ नागरिक आदींनी विविध प्रकारच्या मदतीसाठी गर्दी केली हाेती. खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली.
माेठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यालयात उपस्थित हाेते. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश हाेता. काही दिव्यांगांनी नाेकरीसाठी तर काहींनी कृत्रिम हात व पायांच्या मागणीसाठी निवेदन दिले. नवीन रस्त्यांसाठी, अनुकंपा तत्त्वावरील नाेकऱ्यांसाठी, आराेग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली. यावेळी नितीन गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी गडकरी यांच्यासाेबत चर्चा केली.
विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महाेदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासाेबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटाेमाेबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय गडकरी यांनी ऐकून घेतले. काही तरुणांनी नावीन्यपूर्ण प्रयाेगांचे प्रेझेंटेशन नितीन गडकरींसमाेर दिले. तर विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचेही ना. गडकरी यांनी काैतुक केले.