- Breaking News, Meeting, विदर्भ

गोंदिया समाचार : वैनगंगा नदीवर 395 कोटी निधितून मंजूर डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाला आ. विनोद अग्रवाल यांनी दाखवली गती

■ डांगोर्ली बॅरेजचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली नागपुरात बैठक, आवश्यक प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्याच्या दिल्या सूचना

गोंदिया समाचार : मध्य प्रदेशाच्या सीमेजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर महाराष्ट्राच्या कुशीत असलेल्या गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली गावात शेतीच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरेल 395 कोटी निधितून मंजूर डांगोर्ली बॅरेजच्या बाँधाकामा बाबत आमदार विनोद अग्रवाल पुन्हा तत्परतेने काम करताना दिसत आहेत.

या महत्त्वाकांक्षी डांगोर्ली बॅरेजच्या कामाला गती देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकतीच नागपूर येथील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या जलसंपदा विभाग कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बैठकीदरम्यान विभागाचे कार्यकारी संचालक राजेशजी सोनटक्के, मुख्य अभियंता (गोसीखुर्द प्रकल्प), प्रकाश पवार, अधीक्षक अभियंता आर. वाय. पराते (भंडारा पाटबंधारे मंडळ), अधीक्षक अभियंता श्री. फरकडे (पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ), ई.ई.वराडे, ई.ई.बाघ इटियाडोह श्री. कुरेकर, ई.ई.ए.आय. पाटील (मध्यम प्रकल्प), ईई सोनाली सोनुले (जीआरडी), डी.ई.डोंगरे (बाघ) आदी अधिकारी उपस्थित होते.

डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाला गती द्यावी, येणारे अडथळे दूर करून आवश्यक ते प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

विशेष म्हणजे, डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाबाबत अनेक वर्षांपासून आवाज उठवला जात होता, मात्र त्याचे बांधकाम केवळ स्वप्नच राहिले, मात्र या विधानसभा क्षेत्रातील विनोद अग्रवाल यांनी 2019 मध्ये आमदार होताच कटिबद्ध राहून या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी शासनाचे लक्ष वेधले. हा महत्त्वाकांक्षी बंधारा बांधून सींचनासाठी शेतकरी बांधव व गोंदिया शहरातील जनतेला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी परिसरातील शेतकरी व नागरिकांना दिले होते.

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वारंवार मांडलेला डांगोर्ली बॅरेजचा प्रश्न गांभीर्याने घेत राज्यातील महायुति सरकारने ३९५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी डांगोर्ली बॅरेज प्रकल्पाला अखेर प्रशासकीय मान्यता देऊन गोंदियाला मोठा दिलासा दिला

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, वैनगंगा नदीच्या डांगोर्ली घाटावर बॅरेज बांधण्याचे माझे स्वप्न होते. नदीतील पाण्याची पातळी भरपूर असूनही या पाण्याचा लाभ आजूबाजूच्या गावांना आणि गोंदिया शहराला पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला नव्हता. मात्र आता या बॅरेजच्या बांधकामामुळे तालुक्यातील ५८६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, बंधाऱ्याच्या कामात अनेक अडथळे आले, ते अखंड लढा देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ऑगस्ट 2022 मध्ये MWRRA ची मंजुरी मिळवण्यात यशस्वी झालो. खूप संघर्षानंतर 2023 मध्ये SLTC कडून मंजुरी मिळाली. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, या प्रकल्पाच्या उभारणीमुळे तालुक्यातील टेढ़वा, शिवणी, डांगोर्ली, देवरी, नवेगाव उपसा सिंचन योजनेसह अनेक गावांना सिंचनाचा लाभ होणार असून गोंदिया शहरासह अनेक गावांना 24 तास पाणीपुरवठा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *