नागपूर समाचार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी बुद्ध प्रतिमा व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेऊन अभिवादन केले. येथे आल्यावर नेहमीच नवी प्रेरणा, ऊर्जा, अनुभूती व समाधानही मिळते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.