- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डीतील ग्लोकल मॉल मधील विभागीय कार्यालयाचे शनिवारी, २१ डिसेंबर रोजी आ.प्रवीण दटके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मानाचे दादोजी कोंडदेव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, छत्रपती पुरस्कार असे चारही पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, महापौर अर्चना डेहनकर, माजी क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, माजी नगरसेवक संजय बंगाले, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

खेळाडूंना नोंदणी तसेच अन्य महत्वाची माहिती मिळविण्यासाठी क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाची मोठी मदत होते. या कार्यालयाच्या उद्ाटनानंतर आयोजित आ. प्रवीण दटके यांनी खासदार क्रीडा महोत्सव हा खेळातून ध्येयाकडे प्रेरीत महोत्सव असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे खेळाकडून ध्येयाकडे वाटचाल आणि त्यातून हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली. तोच आदर्श पुढे नेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आयोजित करून तरुणांना ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रेरित केल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी वाटचालीची माहिती दिली. मागील पाच वर्षांचा महोत्सवाच्या प्रवासाचा आढावा घेता महोत्सवाला प्राप्त होत असलेले भव्य स्वरूप आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात पुढे अधिक भव्यदिव्य होईल, असा विश्वास डॉ. पीयूष आंबुलकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन महोत्सवाचे नीरज दोंतुलवार व आभार डॉ. अशफाक शेख यांनी मानले. यावेळी खासदार महोत्सवाचे कोषाध्यक्ष आशीष मुकीम, सदस्य नागेश सहारे, डॉ. संभाजी भोसले, नवनीत सिंग तुली, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *