नागपूर समाचार : पांडे ले आऊट येथील,दत्ताजी डिडोळकर भवनमध्ये संस्कार भारती भू-अलंकरण विधेतर्फे संस्कार भारती रांगोळीच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्यांना सुद्धा संस्कार भारतीची रांगोळी काढता यावी. या उद्देशाने ही कार्यशाळा रविवारी दुपारी १ ते ४ च्या दरम्यान पार पडली.
संस्कार भारती रांगोळी भारतात आणि भारताबाहेर पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या भू-अलंकरण विधेतील अगदी सुरूवातीच्या फळीतील ज्येष्ठ रांगोळी कार्यकर्ते वृदां केकतपुरे, अनिल जोशी, माणिक जोशी व बाबासाहेब नवरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर या ज्येष्ठ रांगोळी कलाकारांचा सन्मान चित्रकला विधा संयोजक इशिता चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्कार भारती ध्येयगीत निधी रानडे यांनी गायले.कार्यक्रमाचे संचालन अभिजीत बोरीकर यांनी केले. राधा कावडे, दीपाली हरदास, मोहिनी माकोडे, हर्षन कावरे व सुमीत ढोरे यांनी रांगोळीचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत रांगोळी व इतर कला क्षेत्रातील कलाकार, कार्यकर्ते व नागरिक असे एकूण ३० प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
संस्कार भारती नागपूर महानगर अध्यक्ष विरेंद्र चांडक, कार्याध्यक्ष डॉ मृणालिनी दस्तुरे यांच्या मार्गदर्शनात शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती नागपूर महानगरचे मंत्री मुकुल मुळे, मनोज श्रौती, श्रीकांत बंगाले, शंतनु हरीदास, कुणाल मुलमुले, प्रदीप मारोटकर,सुप्रिया देशमुख यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.